(राजापूर)
श्री वडचाई व्यायाम शाळा व क्रीडा प्रसारक मंडळ रायपाटण आयोजित तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. मंडळाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने त्याचबरोबर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दामोदर लिंगायत हे जिजामाता हायस्कूल रायपाटण मधून निवृत्त झाले असल्यामुळे या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
या कबड्डी स्पर्धेमध्ये जिजामाता विद्यामंदिर रायपाटण संघाने प्रथम क्रमांक मिळवला आदर्श विद्यामंदिर वाटुळ संघाने द्वितीय क्रमांक तर नूतन विद्यामंदिर ओणी संघाने तृतीय क्रमांकावर आपली मोहर उमटवली.
या स्पर्धेसाठीचे प्रथम क्रमांकाचे५००१ रु. पारितोषिक धनवर्धिनी पतसंस्था रायपाटण ने दिले. द्वितीय क्रमांकाचे ३००१ रु. पारितोषिक वडचाई व्यायाम शाळा रायपाटणने तर तृतीय क्रमांकाचे २००१ रु पारितोषिक संजय शेट्ये यांनी दिले. उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड ही पारितोषिके मंगेश नेवरेकर यांनी दिली. प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड हे सर्व चषक कै. अक्षय दिलीप शेट्ये यांच्या स्मरणार्थ शेट्ये परिवाराकडून देण्यात आले होते.
पंच म्हणून दत्ता गायकवाड संतोष गोसावी दादासो ठोंबरे सुनील गवरे, सुनील जाधव परशुराम इंगळे निमेश बांबरकर यांनी काम पाहिले सर्व खेळाडूंना नाश्ता विजय कानडे व यश पराडकर यांनी दिला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दामोदर लिंगायत, सचिव बाबा शेट्ये, खजिनदार गोपीचंद कारेकर, सदस्य गोपीनाथ नवरे, सतीश पाध्ये, मंगेश पराडकर, किशोर गुरव, माजी उपसभापती, उमेश पराडकर, तेजस रोडे, यश पराडकर, बन्सी मालप, विनायक निखार्गे, दीपक मालप, संदेश बांबरकर, शिवकुमार शेट्ये, मंदार नेवरेकर, अनिल पाटणकर, तक्ष चव्हाण, संकल्प नारकर, विराज बेर्डे, तन्मय नेवरेकर, सन्वीत निखार्गे, पारस राणे, विजय कानडे, अवधूत कानडे यांनी विशेष मेहनत घेतली.

