( राजापूर )
नववर्षाच्या स्वागतासाठी एन्जॉय मित्र मंडळ, आजिवली यांच्या वतीने जामदाखोरे परिसरात प्रथमच भव्य कलगी-तुरा म्हणजेच पारंपरिक जाकडी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम बुधवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी रात्री ठीक ८:३० वाजता उत्साहात पार पडणार आहे.
या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने एन्जॉय मित्र मंडळ, आजिवली आपली १० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आहे. गेल्या दहा वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि लोकसहभागातून साजरे करण्यात आले असून, या उपक्रमांना नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे.
नववर्षाच्या सुरुवातीलाच आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्यावहिल्या कलगी-तुरा (जाकडी नृत्य) स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक लोककलेला प्रोत्साहन देणे आणि नव्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
वेळेअभावी वैयक्तिकरित्या सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने, कार्यक्रमासाठी स्वेच्छेने देणगी स्वरूपात मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी GPAY / PhonePe ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देणगीसाठी नागरिकांनी अनिकेत राणे – 7218223300 किंवा भरत राणे – 7208122880 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एन्जॉय मित्र मंडळ, आजिवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नववर्षाच्या या सांस्कृतिक पर्वाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

