(संगमेश्वर / प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रत्नागिरी येथील सहाय्यक वाहतूक निरीक्षक विश्वनाथ शंकर बाईत हे शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रदीर्घ व सेवाभावी कारकिर्दीनंतर सेवानिवृत्त होत आहेत.
सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणा, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेने आपली जबाबदारी पार पाडत महामंडळाच्या प्रतिमेला उंची दिली. त्यांच्या कार्यकाळात अधिकारी, कर्मचारी व प्रवाशांशी जपलेले आपुलकीचे संबंध सर्वश्रुत आहेत.
सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ विभागीय वाहतूक शाखा, रा.प., रत्नागिरी येथे समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या आनंदाच्या क्षणी सेवा काळात लाभलेल्या प्रेमळ सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी सहकारी, मित्रपरिवार व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वनाथ बाईत यांनी केले आहे.

