(साखरपा / भरत माने)
साखरपा गावात गुरववाडी सहान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीचा खुणा काढण्याचा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला. ग्रामस्थांच्या सहभागामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पालखी पूजनाने झाली. त्यानंतर वाजत-गाजत आणि ढोल-ताशांच्या निनादात पालखी नाचविण्यात आली. यावेळी मानकरी, गावकरी यांनी पारंपरिक वेशभूषेत, तर तरुणांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
पालखीचा खुणा काढण्याची परंपरा जपताना ज्येष्ठ गुरव बंधू, गोवरे बंधू यांनी या सोहळ्याचे महत्त्व सांगितले. “ही परंपरा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आपल्या देवतेचा महिमा अगाथ असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानकरी, गावकरी, ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

