(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुःखद निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद संगमेश्वर शहरातही उमटले असून, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संगमेश्वर व्यापारी संघटनेने बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयासाठी व्यापारी संघटनेची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या कार्याला आणि स्मृतीला सन्मान देण्यासाठी आज, २८ जानेवारी रोजी, संगमेश्वरची संपूर्ण बाजारपेठ दुपारी २ वाजल्यापासून बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
या बंदला व्यापारी, व्यावसायिक तसेच नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असून, शहरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

