(संगमेश्वर)
शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशन (माध्यमिक व उच्च माध्यमिक) आणि United Computer Education Center, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘Cyber Security & AI Technology Information’ या विषयावर जिल्हास्तरीय परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक गटात कडवई येथील द एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ए. ई. कालसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. राहत सम्रान हफसानी हिने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञान विषयांवरील या परीक्षेत मिळवलेले यश हे विद्यार्थिनीच्या मेहनतीचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या योग्य दिशा देणाऱ्या प्रयत्नांचे फलित असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. रिजवान कारीगर यांनी कु. राहत हिचे तसेच तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

