(राजापूर / तुषार पाचलकर)
लांजा–राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत हे आपल्या प्रभावी कार्यशैलीसोबतच साध्या, आपुलकीच्या वागणुकीसाठी संपूर्ण कोकणात ओळखले जातात. त्यांच्या या साधेपणामुळेच ग्रामीण भागातील जनतेमध्ये त्यांच्याविषयी विशेष जिव्हाळा निर्माण झाला आहे.
आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी लांजा येथे झालेल्या शासकीय ध्वजारोहणाच्या वेळी आमदार सामंत यांनी पुन्हा एकदा हा साधेपणा कृतीतून दाखवून दिला. शिष्टाचारानुसार तहसीलदारांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांना अधिकाऱ्यांसोबत व्यासपीठावर उभे राहून मानवंदना देण्याचा मान असतो. मात्र, आमदार किरण सामंत यांनी हा शिष्टाचार बाजूला ठेवत उपस्थित सर्वसामान्य नागरिकांमध्ये उभे राहून त्यांच्यासोबतच राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
आमदार स्वतः जनतेमध्ये उभे राहिल्याचे दृश्य पाहून उपस्थित लांजावासीय भावूक झाले. ध्वजारोहणानंतर अनेक नागरिकांनी “सर्वसामान्यांचा आमदार कसा असावा, तर तो किरण भैय्यासारखाच असावा,” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या कृतीतून आमदार किरण सामंत यांनी पदापेक्षा माणुसकी आणि जनतेशी असलेली नाळ महत्त्वाची असल्याचा संदेश दिल्याचे लांजावासीयांनी सांगितले.

