( लांजा / वार्ताहर )
संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी, नगर पंचायत देवरुख तायक्वांदो क्लब आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्योरुगी व पुमसे स्पर्धा – २०२६ नुकत्याच देवरुख येथे उत्साहात पार पडल्या. १० ते १२ जुलै या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत लांजा तालुक्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ४ सुवर्ण आणि ३ कांस्य पदकांची कमाई केली.
सुवर्णपदक विजेते
स्पर्धेत स्वर्णीम श्रेयस शेट्ये, योगेश ईश्वर तोंडारे, भक्ती भागवत कुंभार आणि तेजस्वी दशरथ लाड यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सुवर्णपदक पटकावत लांजा तालुक्याचा गौरव वाढविला.
कांस्यपदक विजेते
तसेच अमायरा मोहसीन अपराध, माऊली तुषार चव्हाण आणि वृत्ती रंजन पावसकर यांनी कांस्यपदक मिळवत स्पर्धेत आपला ठसा उमटविला.
इतर खेळाडूंचाही उल्लेखनीय सहभाग
या स्पर्धेत युगा प्रसाद डोर्ले, अन्वी सचिन पवार, आदी रंजन पावसकर, दीपराज युवराज खानविलकर, तनया संदीप पाटकर, आर्या सचिन पवार, सात्विक श्रेयस साळुंखे, रीया प्रमोद लांजेकर, आराध्य कमलाकर सावंत आणि आदिश्री अभय शेट्ये यांनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत लांजा अकॅडमीच्या सचिव तसेच राष्ट्रीय पंच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून प्रभावी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कामगिरीचेही सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. खेळाडूंच्या यशामागे लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, प्रमुख प्रशिक्षिका शितल विरेंद्र आचरेकर तसेच सहप्रशिक्षक गौरव दीपक खेडेकर आणि गणेश ईश्वर तोंडारे यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.
विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
या उल्लेखनीय यशाबद्दल तायक्वांदो फिटनेस अकॅडमी, लांजा आणि गुरुकुल अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडिज, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे व लक्ष्मण कर्रा, अकॅडमीचे मार्गदर्शक तेजस वडवळकर, तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे खजिनदार व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश कर्रा, सचिव लक्ष्मण कर्रा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे आणि कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
लांजा तालुक्यातील खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत केलेल्या या दमदार कामगिरीमुळे तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही हे खेळाडू उल्लेखनीय यश मिळवतील, असा विश्वास प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

