( रत्नागिरी )
गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या पुरुष व महिला क्रॉसकंट्री संघाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग क्रॉसकंट्री १० कि.मी. धावणे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. या यशासह महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी सांघिक उपविजेतेपद मिळवले आहे.
दि. ६ व ७ जानेवारी २०२६ रोजी मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग क्रमांक ४ आणि डी. जी. तटकरे आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय, तळा–माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोंकण विभागातील विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष व महिला संघांनी उत्कृष्ट सांघिक समन्वय आणि शारीरिक क्षमतेचे प्रदर्शन करत मुंबई विद्यापीठ कोंकण विभाग क्रॉसकंट्री १० कि.मी. स्पर्धेत उपविजेतेपद आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
या यशाबद्दल विजेत्या खेळाडूंना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सन्माननीय सदस्य तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व सेवकांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे यश महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला नवा आयाम देणारे असून आगामी विद्यापीठस्तरीय स्पर्धांसाठी संघाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.

