( रत्नागिरी )
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. राष्ट्रीय महासचिव राहुल शेंडे आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य अध्यक्ष रविंद्र गुरचळ व राज्य महासचिव विजय बनसोड यांनी ही घोषणा केली. या निवड प्रक्रियेसाठी आयोजित बैठकीस राज्य मुख्यसंघटक बुधाजी वाढविंदे, राज्य सहसचिव हेमंत जाधव, राज्य सदस्य निरंजन जाधव तसेच कोकण विभाग प्रभारी सुधीर धामनकर आणि महेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील उपासक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने या बैठकीत सहभागी झाले होते.
या निवड प्रक्रियेनंतर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी उदय मोहिते, उपाध्यक्षपदी महेश सकपाळ, महासचिवपदी संदीप कांबळे, कोषाध्यक्षपदी अतिश मोहिते, मुख्य संघटकपदी मुकेश कांबळे, सहसंघटकपदी वैभव मोहिते, सदस्य म्हणून विश्वनाथ जाधव तर गुहगर तालुकाध्यक्षपदी सुरेंद्र सुर्वे यांची निवड झाली आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांची ही घोषणा करण्यात आल्याची माहिती राज्य मीडिया समन्वयक डॉ. डी. एन. जाधव यांनी दिली.

