(जाकादेवी / संतोष पवार)
धम्मक्रांती कलामंच तालुका रत्नागिरी या कार्यकारी मंडळाची सभा रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी दु.२ वा जाकादेवी खालगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन जाकादेवी खालगाव,(जाकादेवी हायस्कूलच्या मागे) धम्मक्रांती कला मंचाचे तालुकाध्यक्ष ,कवी गायक रविकांत सोनू पवार यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या सभेत प्रत्येक गावातील कलामंडळे, कलाकार यांचे सर्व्हेक्षण करण्याचे नियोजन करणे. राबवावयाच्या उपक्रमांची यादी तयार करून सद्यकाळात घेण्यास शक्य उपक्रमांची निवड करून त्यांच्या नियोजनाची चर्चा, संस्थेच्या आर्थिक स्थितीसाठी विचारविनिमय, सद्य स्थितीतील कार्यकारी मंडळाच्या रचनेत वाढ करणे बाबत, अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्यावेळेचे विषय अशा अनेक विषयांवर सभा संपन्न होणार आहे.
तरी या सभेला रत्नागिरी तालुक्यातील कार्यकारणीने उपस्थित राहण्याचे आवाहन कला मंचाच्यावतीने तालुकाध्यक्ष रविकांत पवार, सरचिटणीस सतिश कदम यांनी केले आहे.

