(राजापूर / तुषार पाचलकर)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी राजापूर तालुक्यातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राजापूर–लांजा–साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी ही उमेदवारी यादी प्रसिद्ध केली आहे.
राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. वडहसोळे गटातून श्री. प्रतीक शांताराम मठकर, जुवाठी गटातून श्री. रमेश राजाराम सुद, धोपेश्वर गटातून श्री. प्रकाश धोंडू कुवळेकर, साखरीनाटे गटातून सौ. कोमल कल्याण नवाळे, तर कातळी गटातून सौ. सोनाली वसंत टूकरूल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उर्वरित गटांचे उमेदवार लवकरच जाहीर केले जाणार असल्याचेही कळवण्यात आले आहे.
याचबरोबर राजापूर तालुका पंचायत समिती गणांसाठीही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. वडहसोळ गणातून श्री. गौतम विश्राम जाधव, रायपाटण गणातून श्री. उमेश केशव पराडकर, तळवडे गणातून सौ. अपेक्षा मासये, ताम्हाणे गणातून सौ. समीक्षा वाफेलकर, केळवली गणातून सौ. भाग्यश्री भरत लाड, जुवाठी गणातून श्री. प्रसाद नारायण मोरकर, धोपेश्वर गणातून श्री. अभिजित गुरव, पेंडखले गणातून श्री. राजेश हरिश्चंद्र गुरव, नाटे गणातून सौ. सुवर्णा रामचंद्र बांदकर, साखरीनाटे गणातून सौ. स्पृहा काशीनाथ गुरव, अणसूरे गणातून सौ. जान्हवी जितेंद्र गावकर, तर कातळी गणातून श्री. पंढरीनाथ मयेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या सर्व उमेदवारांना पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म देण्यात आले असून येत्या उद्या बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकीत राजापूर तालुक्यात शिवसेना मजबूत कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

