(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे वरची सुकम वाडी येथे श्री गणेश सेवा मंडळ व तरुण विकास मंडळ मुंबई आणि सांगली ग्रुप यांच्या माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजता अभिषेक तीन ते सहा विविध खेळांच्या स्पर्धा सात वाजता आरती 7 ते 8 हरिपाठ रात्र नऊ वाजता ह. भ .प .श्री चंद्रकांत बुवा पवार यांचे कीर्तन
गुरुवार दिनांक 22 रोजी 9 ते 11 श्री गणेश जन्म सोहळा 11ते 1 श्री सत्यनारायणाची महापूजा 1.30 ते 3 . 30 महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 7 प्रदक्षिणा रात्र 10 वा. मान्यवरांचे स्वागत समारंभ.
या कार्यक्रमाला आमदार भैय्या सामंत, उद्योजक आर डी सामंत, माजी आमदार राजन साळवी, अविनाश लाड, उद्योजक प्रसाद पाटोळे, जया माने, विलास चाळके, उद्योजक अरुण शिंदे, बापू शेटे, रजनी चिंगळे, प्रमुख पाहुणे मंडळी उपस्थित राहणार आहेत. यानंतर हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली यांचा बहारदार नमनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गावकर मनोहर सुकम व सर्व मंडळ ग्रामस्थ महिला मंडळ यांनी केले आहे.

