(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्ववर तालुक्यातील कळंबस्ते भीमनगर येथील येथील विजय तुकाराम मोहिते (वय वर्ष 52) यांनी ते राहत असलेल्या घरात ओटीवर फॅन अडकवण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी भाळाला नायलॉनची रस्सी अडकवून त्याद्वारे स्वतःच्या गळ्याला फास लावून आत्महत्त्या केल्याची घटना गुरुवारी 2 जानेवारी रोजी घडली आहे.
विजय मोहिते हे घरात एकटेच होते होते. त्यांनी घराच्या ओटीवर फॅन लावण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी भाळाला प्लास्टिक खुर्ची वर उभा राहून नायलॉन रस्सी त्या भाळाला अडकवून तिचा फास गळ्याला अडकवून उभा राहण्यासाठी घेतलेल्या खुर्चीला पायाने दूर लोटून देत आत्महत्त्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी11 च्या सुमारास उघड झाली. आत्महत्त्याचे कारण समजू शकले नाही.
घडलेल्या घटनेची फिर्याद भरत भाऊ मोहिते यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली असून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्सटेबल सचिन कामेरकर करत आहेत.