(देवळे / प्रकाश चाळके)
साखरपा येथील पद्मा कन्या शाळा साखरपा मधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. संस्कृती निलेश तरंगे हिने रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या “जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान” या स्पर्धात्मक उपक्रमांतर्गत सन 2025-26 च्या नासा व इस्रो दौऱ्यासाठी निवड झाली आहे. ही निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खरंतर संस्कृती तरेंगेला पहिल्यापासूनच विज्ञान विषयाची व स्पर्धा परीक्षांची आवड आहे. संशोधनात्मक जिज्ञासू वृत्तीतून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाकडे ती आकर्षित झाली आणि नासा व इस्रो दौऱ्यासाठी तिने आपली पात्रता सिद्ध केली.
तिच्या या यशामागे तिच्या शाळेतील वर्गशिक्षिका सौ.निलम महेश शेडे पालक श्री निलेश तरंगे व वर्षा तरंगे तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद केंद्र दाभोळे व साखरपा केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले. श्री. प्रतापशेठ सावंत परिवार साखारपा यांच्या हस्ते संस्कृती निलेश तरंगे हीचा सत्कार करण्यात आला. तिच्या यशाबद्दल साखरपा कोंडगाव दाभोळे परिसरातून अभिनंदन होत आहे.

