(संगमेश्वर)
संगम ज्येष्ठ नागरिक संघ, घरडा केमिकल्स, आय.एल.सी.आय. आणि लायन्स क्लब ऑफ संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लक्षणीय वाढवली.
शिबिराच्या उद्घाटन व परीसरात सरपंच सौ. प्रदन्या कोळवणकर, उपसरपंच श्री. विवेक शेरे, संगम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. प्रमोद शेटये, उपाध्यक्ष श्री. उदय संसारे, कोषाध्यक्ष श्री. जनार्दन शिरगावकर, माजी अध्यक्ष श्री. बी. डी. साळवी (भाऊ), माजी कार्यवाह श्री. एम. एस. पवार, माजी कोषाध्यक्ष श्री. विनायक पाथरे, माजी मुख्याध्यापिका सौ. अपर्णा संसारे, लायन्स क्लब ऑफ संगमेश्वरचे अध्यक्ष श्री. रविंद्र शिंदे, घरडा केमिकल्सचे डॉक्टर व सिस्टर, इतर आरोग्य सेवक, आय.एल.सी.आय.चे सुशांत सोनावणे व त्यांच्या सहकाऱ्यांसह लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्य व सहभागामुळे हे आरोग्य तपासणी शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. विशेष म्हणजे माजी मुख्याध्यापक व पत्रकार श्री. श्रीकृष्ण खातू तसेच श्री. प्रवीण गुरव यांचे शिबिरासाठी अमूल्य सहकार्य मिळाले. ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेतलेल्या वैद्यकीय तपासण्यांमुळे शिबिराला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला.

