(तरवळ / अमित जाधव)
जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या संस्थान श्रीदेव गणपतीपुळे देवस्थान समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुकास्तरीय पठण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी श्रीदेव गणपतीपुळे येथील भक्त निवासात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.
स्पर्धांचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता देवस्थान समितीचे सरपंच निलेश कोल्हटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी खजिनदार अमित मेहेंदळे, सचिव विद्याधर शेंडे, पंच विनायक राऊत, श्रीराम केळकर आणि श्रीहरी रानडे उपस्थित होते.
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सहा गटांमध्ये झालेल्या या स्पर्धांमध्ये तालुक्यातील एकूण १६२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळपासून सुरू असलेल्या स्पर्धांनंतर संध्याकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:
गट १: पहिली ते तिसरी (विषय – श्री गणपती स्तोत्र, संस्कृत)
प्रथम: ऋग्वेद रितेश रेवाळे (कृ. वी. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी)
द्वितीय: देविका दिनेश चव्हाण (जि. प. प्राथमिक शाळा, गणपतीपुळे)
तृतीय: स्वरा अनिल रामाणी (जि. प. प्राथमिक शाळा, भंडारपुळे)
गट २: तिसरी ते चौथी (विषय – मनाचे श्लोक ६१ ते ८०)
प्रथम: भक्ती निलेश अभ्यंकर (जि. प. प्राथमिक शाळा, मालगुंड तळेपाट नं. २)
द्वितीय: सौमी सुशील भुते (जि. प. प्राथमिक शाळा, भगवतीनगर)
तृतीय: ईशान प्रणव काणे (जि. प. प्राथमिक शाळा, निवेंडी)
गट ३: पाचवी ते सहावी (विषय – मनाचे श्लोक १८१ ते २००)
प्रथम: वल्लरी विश्वनाथ मुकादम (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी)
द्वितीय: स्वरा मकरंद काणे (बळीराम परकर विद्यालय, मालगुंड)
तृतीय: वैष्णवी शैलेश घाणेकर (जि. प. प्राथमिक शाळा, भगवतीनगर)
गट ४: सातवी ते आठवी (विषय – रामरक्षा)
प्रथम: धैर्या नरेंद्र गावणकर (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी)
द्वितीय: अनय वैभव कानडे (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी)
तृतीय: आर्या अतुल रानडे (बळीराम परकर विद्यालय, मालगुंड)
गट ५: नववी ते दहावी (विषय – शिव महिम्न स्तोत्र)
प्रथम: निधी चारुल मोडक (फाटक हायस्कूल, रत्नागिरी)
द्वितीय: श्रीराज राजेश ओक (बळीराम परकर विद्यालय, मालगुंड)
तृतीय: श्रीयश श्रीहरी रानडे (बळीराम परकर विद्यालय, मालगुंड)
गट ६: अकरावी ते बारावी (विषय – श्रीमद्भगवद्गीता, १६वा अध्याय)
प्रथम: प्रांजली सतीश बोले (जयगड ज्युनिअर कॉलेज)
द्वितीय: श्रुती सिद्धार्थ चव्हाण (जयगड ज्युनिअर कॉलेज)
तृतीय: स्वानंदी पंकज भोसले (जाकादेवी कनिष्ठ महाविद्यालय)
पहिल्या तीन गटांतील विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये १२५१, १००१ आणि ७५१, तर उर्वरित तीन गटांतील विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये १७५१, १५५१ आणि १२५१, सहभाग प्रमाणपत्रे व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून श्री. पाटवकर, वासुदेव केळकर, श्रीकांत मेहेंदळे, मिलिंद सुर्वे, बाबासो बेडक्याळे आणि सुशांत लाकडे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीदेव गणपतीपुळे देवस्थानचे सर्व कर्मचारी आणि भक्त निवासातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

