(वाटद खंडाळा / सचिन कुळये)
कोकणचे लाडके नेतृत्व लोकनेते शामरावजी पेजे यांच्या १०९ व्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात भव्य जिल्हा परिषद गट मर्यादित ‘रेकॉर्ड डान्स’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘साडेबावीस खेडी कुणबी समाज संघटना’ आणि ‘लोकनेते शामरावजी पेजे सामाजिक, शैक्षणिक विकास संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा शुक्रवार, १७ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना मिळणार व्यासपीठ
परिसरातील विद्यार्थ्यांमधील नृत्यकलेला चालना देणे, त्यांचे सुप्त कलागुण विकसित करणे आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वैयक्तिक व सांघिक अशा दोन गटांत होणार असून ५ ते १८ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत.
आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा
विजेत्या स्पर्धकांसाठी रोख बक्षिसे व सन्मानचिन्हे ठेवण्यात आली आहेत.
सांघिक गट
प्रथम : ₹१०,१०१
द्वितीय : ₹७,१०९
तृतीय : ₹५,१०९
वैयक्तिक गट
प्रथम : ₹५,१०९
द्वितीय : ₹३,१०९
तृतीय : ₹२,१०९
याशिवाय, सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेचे ठिकाण व वेळ
ही स्पर्धा खंडाळा–जयगड रोडवरील जिल्हा परिषद शाळा, वाटद खंडाळा येथील मागील पटांगणात सायंकाळी ७ ते १० या वेळेत होणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
नाव नोंदणीची माहिती
स्पर्धेसाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख १० जानेवारी २०२६ असून, पहिल्या २५ स्पर्धकांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक विद्यार्थी व शाळांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
श्री. सुजित दुर्गवळी : ७५१७५४३१२२
श्री. नंदकुमार बेंद्रे : ८३९०२११११२
श्री. प्रथमेश गवाणकर : ७८७५३३३४०३
परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या नृत्यकलेचा ठसा उमटवावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

