(रत्नागिरी)
विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात रत्नागिरी येथील शिर्के विद्यालयाची स्वरा मिलिंद कदम, तर मुलांच्या गटात कोल्हापूरच्या ओमकार राजू वडर यांनी प्रथम क्रमांक पटकावत रत्नागिरीचा दबदबा निर्माण केला आहे. या स्पर्धेवर रत्नागिरी जिल्ह्याचे वर्चस्व राहीले आहे. १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली गटातील प्रत्येकी १ ते ६ क्रमांकाचे खेळाडू १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आंबोली सैनिक स्कूल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित विभागीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, गणेश खैरमोडे, अक्षय मारकड, गणेश जगताप, पंच मंदार दळवी व सागर कुलकर्णी, स्पर्धाप्रमुख मिलिंद साप्ते आदींच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेतील १ ते ६ क्रमांक पटकावलेले खेळाडू पुढीलप्रमाणे:
१४ वर्षाखालील मुली गट : स्वरा मिलिंद कदम, स्वरा सुरेश मोहिरे, साक्षी रमेश रामदूरकर, जान्हवी बळीराम निशाद, सृष्टी पंकज चवंडे, आस्था अभिमन्यू लोंढे.
मुले गट: ओमकार राजू वडर (कोल्हापूर), सर्वेश गणेश अमरे (जैतापूर), वेदांत राजेश करगुटकर (जैतापूर), निखिल लक्ष्मण पाटील (कोल्हापूर), स्मित राजेंद्र कदम (गुहागर), आरफात चौगुले (सिंधुदुर्ग).
१७ वर्षांखालील मूली – ईश्वरी धैर्यशील पाटील (कोल्हापूर), पूर्वा दीपक कोतकर (देवगड), सेजल सुभाष जाधव (रत्नागिरी), श्रेया राजेंद्र महाडिक (सिंधुदुर्ग), तनिष्का दिलीप कडव (सातारा), खुशी नरेंद्र आयरे (रत्नागिरी).
मुले गट – ओम दिनेश पारकर (रत्नागिरी), अमूल्य अरूण घाडी (सावंतवाडी), दिलीप हद्दीमनी सांगली), मोहम्मद अजीम अस्लम शेख (इचलकरंजी), स्वप्निल मंगेश ( लाखे (सावंतवाडी), वेदांत विजय पाटील (कोल्हापूर).
१९ वर्षाखालील मुली गट- प्रणिता नथुराम आयरे (सावंतवाडी), श्रावणी विजय कोलगे (रत्नागिरी), श्रावणी रमेश साबळे (सातारा), मुक्ता अविनाश पेंडसे रत्नागिरी), समीरा सचिन शिंदे (रत्नागिरी), दिपाली कैलास माळी (सांगली). मुले गट: राम प्रकाश फाले (सावंतवाडी), संस्कार सुनील कांबळे (सांगली), ओंकार रामचंद्र रामदास शिंदे (सातारा), आजान समीर मुजावर (सांगली), वेदांत विनायक वायंगणकर (सिंधुदुर्ग), अभिषेक सुनील केंचे (सांगली).