(रत्नागिरी / वार्ताहर)
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ईद-ए-मिलाद म्हणून साजरा करण्यात येतो. ईद मिलादुन्नबी चा अर्थ हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस इस्लामिक कालगणना मधील तिसरा महिना रबीउल अव्वल च्या 12 तारखेला म्हणजेच 12 रबीउल अव्वलला साजरा केला जातो.
मिलादुन्नबी इस्लामिक विश्वातला पवित्र दिवस मानला जातो. ईद-ए-मिलाद चे औचित्य साधून रत्नागिरी शहरात दिनांक 16 सप्टेंबर रोजी ठीक सकाळी साडेआठ वाजता रॅली चे आयोजन करण्यात आले आहे,सदर (जुलूस) कोकण नगर येथून निघेल, सदर रॅलीचा मार्ग कोकण नगर, मारुती मंदिर, उद्यम नगर ते कोकण नगर येथे शेवट होईल तसेच 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी ठीक 07:00वाजता वाजता लहान मुलांच्या रॅलीचे सुद्धा आयोजन कोकण नगर येथे करण्यात आले आहे आणि 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:00 वाजता ईद-ए-मिलाद च्या भव्य मैफिल चे आयोजन कोकण नगर फैजाने अत्तार येथे करण्यात आले आहे.
तसेच कोकण नगर येथून ठीक सकाळी 8:30वाजता रॅलीला सुरुवात होईल. तसेच ईद-ए-मिलाद चे औचित्य साधुन विशेष मुस्लिम महिलांसाठी उद्यम नगर मेमन समाज हॉल येथे 16 सप्टेंबर रोजी दुपारी 03:00 वाजता भव्य इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व महिलांनी इज्तिमा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे. रॅली (जुलूस ) ठीक सकाळी 8:30 वाजता सुरू होईल.