( संगमेश्वर / प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी धनुर्विद्या स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कुल च्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. या निवडचाचणी स्पर्धेतुन भाईशा घोसाळकर हायस्कुलच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यसंघात निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या असोसिएशनच्या अधिपत्या खाली व सोलापूर जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन च्या सहकार्याने आयोजित १७ वी मिनी सब जुनीयर व २ री किड्स राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्य पद स्पर्धा २०२५ -२६ लवकरच सम्पन्न होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी १ जानेवारी २०२६ रोजी जिल्हास्तरीय निवडचाचणीचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा १० ,१३ व १५ वयोगटातील मुले व मुली यांच्यात खेळवण्यात आली. सदर स्पर्धा कम्पाउंड, रिकर्व्ह आणि इंडियन या प्रकारात घेतली गेली.
या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातुन अनेक खेळाडू सहभागी झाले होते. कडवई पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या पाच खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या पाचही विध्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या जिल्हा संघात निवड झाली. यात साइराज सुर्वे, स्वराज चव्हाण, आर्या जोयशी, स्वरा इंजले व परिणीती कांबळे यांचा समावेश आहे .निवड झालेल्या खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनीनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत यलगुडकर, सचिव वसंत उजगावकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण, मुख्याध्यापक शेषेराव अवघडे यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. हे यश मिळवण्यासाठी प्रशिक्षक संतोष साळुंके व खेळाडूनी विशेष परिश्रम घेतले.

