(साखरपा / भरत माने)
सकाळीं आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली वाहतूक अखेर पुन्हा सुरू झाली आहे. रवी इन्फ्रा ठेकेदार कंपनीच्या मशीनच्या सहाय्याने दरड बाजूला करण्यात आली आहे. या कामात पोलीस यंत्रणा व महसूल विभागानेही विशेष मेहनत घेतली.
दरड कोसळल्यामुळे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर रस्ता खुला झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. या ठिकाणाहून वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने आणि कमी वेगाने वाहने चालवावीत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

