(राजापूर)
तालुक्यातील कुवेशी तेलीवाडी येथील २६ वर्षीय विघ्नेश संतोष कुवेसकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ जून २०२५ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याबाबत नाटे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विघ्नेश याने फणसे पेट्रोल पंप (कुवेशी) येथून जवळ असलेल्या कोणीचा टेम या जंगलमय परिसरातील झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीने गळफास घेतला. काही वेळाने या घटनेची माहिती मिळताच त्याच्या वडिलांनी नाटे पोलीस ठाण्यात खबर दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, या प्रकरणी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेण्यात आली आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अधिक तपास नाटे पोलीस करीत आहेत.