(रत्नागिरी)
गोगटे जोगळेकर महाविद्यालय( स्वायत्त) रत्नागिरी वार्षिक सांस्कृतिक झेप महोत्सव सुरू झाला आहे. उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी यावर्षी होणाऱ्या 72 कला प्रकाराच्या स्पर्धांचे आयोजन पाहून म्हटले आहे की, झेपमध्ये कायमच विद्यार्थी विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. यावर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणजे गेल्या वर्षी सुरु झालेल्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षाच्या ते पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या लोककलेचा दोन तासाचा दर्जेदार कार्यक्रम आयोजित केला होता.
विद्यार्थी उद्योजकांसाठी 24 स्टॉलचे आयोजन केले आहे. त्यामध्ये विद्यार्थी उद्योजक आपले बिजनेस पार्टनर निश्चित करतात, प्रारंभिक रक्कम उद्योगांमध्ये गुंतवतात आणि दिवसभरामध्ये किती बिझनेस होऊ शकतो याचा अंदाज घेऊन स्टॉलचे नियोजन करतात, अशी उद्योजकाची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारे आपले एकमेव महाविद्यालय आहे. त्याचबरोबर यावर्षी कार्यक्रम व्यवस्थापनासाठी महाराजा करंडक दिला जातो, त्याला वीस वर्षे पूर्ण होत आहेत. गेलेली वीस वर्ष व्यवस्थापन शास्त्राचा केवळ अभ्यास न करता अनुभव घ्यावा या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे एकमेव आहे.
झेप च्या उद्घाटन प्रसंगी हिंदी कलाक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील रीदमिष्ठ श्री विजय शिवलकर यांनी आपल्या रत्नागिरीतील महाविद्यालयामध्ये इतके शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या डिग्री संदर्भात आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे जाहीर केले. त्याचबरोबर त्या बी पी ए विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर यांनी झेप महोत्सव केवळ सांस्कृतिक महोत्सव नाहीतर व्यवस्थापनाची सुद्धा स्पर्धा होते संपूर्ण जबाबदारी विद्यार्थी घेत असतात हे अतिशय समाधानकारक गोष्ट आहे असे आवर्जून सांगितले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री.सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, नियामक मंडळाचे सदस्य मंदार गाडगीळ आणि मनोज पाटणकर, विशेष अतिथी विजय शिवलकर, प्राचार्य डॉ.मकरंद साकळकर प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा च्या माजी उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे,विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी, झेप समन्वयक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर उपस्थित होते.

