(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील संयुक्त गोसावीवाडी ग्रामस्थ मंडळ व सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट मुचरी यांनी महाशिवरात्री उत्सवानिमित्त तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत अंतिम सामन्यात जुगाई विघ्रवली संघावर मात करत मैत्री कडवई संघाने विजेतेपद पटकावले.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत हरपुडे संघाने तृतीय तर गांगोबा माईनवाडी संघाने चतुर्थ क्रमांकावर मोहर उमटवली. बेस्ट रेडर विघ्रवली संघाचा गौरव धामणे,बेस्ट डिफेंडर मैत्री संघाचा सर्वेश सुर्वे तर सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार मैत्री संघाच्या दिप्तेश जोशी याला मिळाला. या स्पर्धेत तालुक्यातील सुमारे २४ संघानी भाग घेतला.
या स्पर्धेसाठी रोख बक्षिसे ऍड.संदेश शेट्ये यांच्याकडून देण्यात आली.प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफी चिपळूण – संगमेश्वर मतदार संघाचे लाडके आमदार शेखरजी निकम सर यांच्याकडून देण्यात आल्या तर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी नामदेव सोलीम यांच्यातर्फे कै. नंदिनी सोलीम यांच्या स्मरणार्थ व चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी राजाराम बांद्रे यांच्यातर्फे कै.रुक्मिणी बांद्रे यांच्या स्मरणार्थ देण्यात आली.सहभागी सर्व संघाना सहभागी झाल्याबद्दल राजाराम बांद्रे व मंगेश बांद्रे यांच्यातर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण गोसावी, उपाध्यक्ष दत्ताराम कापडी, सचिव सुभाष गोसावी, खजिनदार प्रकाश गोसावी, विकास बेटकर व सदस्य, महिला मंडळ तसेच नवोदित कार्यकर्ते चेतन गोसावी, सार्थक बांद्रे, निलेश बांद्रे, सीताराम कानसे, सर्वेश बांद्रे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद शिंदे व डॉ.गणेश शेलार यांनी केले.