(नवी दिल्ली)
भारतीय रेल्वेने प्रवासी भाड्याचे रॅशनलायझेशन (Rationalisation of Passenger Fare) जाहीर केले असून, हे नवे दर 26 डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. वाढता परिचालन खर्च, मनुष्यबळ व पेन्शनवरील खर्च तसेच रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे भाडेवाढ
रेल्वेने स्पष्ट केले आहे की, भाडेवाढ अत्यल्प असून सर्वसामान्य व नियमित प्रवाशांवर मोठा आर्थिक बोजा पडणार नाही.
- उपनगरीय रेल्वे (Suburban / लोकल) लोकल रेल्वेच्या भाड्यात कोणतीही वाढ नाही
- मासिक पासच्या दरांमध्ये कोणताही बदल नाही
- पॅसेंजर / साधी गाडी (Ordinary Class) 215 किमीपर्यंत कोणतीही भाडेवाढ नाही
- 215 किमीपेक्षा जास्त अंतरासाठी – 1 पैसा प्रति किमी दरवाढ
- मेल / एक्स्प्रेस – नॉन एसी (Mail/Express Non-AC) 2 पैसे प्रति किमी भाडेवाढ
- एसी वर्ग (AC Class) एसी कोचसाठी देखील 2 पैसे प्रति किमी अतिरिक्त भाडे
उदाहरण, जर एखादा प्रवासी नॉन-एसी एक्स्प्रेस ट्रेनने 500 किमी प्रवास करत असेल, तर त्याला फक्त 10 रुपये अधिक भाडे द्यावे लागेल.
- भाडेवाढीमागची कारणे
मनुष्यबळ खर्च: ₹1,15,000 कोटी - पेन्शन खर्च: ₹60,000 कोटी
- एकूण परिचालन खर्च (2024-25): ₹2,63,000 कोटी
रेल्वेच्या सुरक्षिततेत सुधारणा, नेटवर्क विस्तार, नवीन तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा उभारणीसाठी निधी उभारणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. या भाडेवाढीमुळे 2025-26 मध्ये सुमारे ₹600 कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गरिब प्रवासी, रोजचे प्रवासी आणि उपनगरीय भागातील नागरिकांवर परिणाम होऊ नये यासाठीच लोकल व मासिक पासचे दर कायम ठेवण्यात आले आहेत.

