(रत्नागिरी)
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने उत्तर रेल्वेच्या समन्वयाने अमृतसर–मडगाव (गोवा) विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेमुळे पर्यटनासाठी गोव्याकडे जाणाऱ्या तसेच सणासुदीच्या काळात कोकणात येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अमृतसर–मडगाव विशेष एक्स्प्रेस वेळापत्रक
१) अमृतसर ते मडगाव जंक्शन (गाडी क्र. 04694)
सुटण्याची तारीख: 22/12/2025, 27/12/2025, 01/01/2026 (सोमवार)
सुटण्याची वेळ: पहाटे 05:10 (अमृतसर)
पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी रात्री 23:55 (मडगाव)
२) मडगाव जंक्शन ते अमृतसर (गाडी क्र. 04693)
सुटण्याची तारीख: 24/12/2025, 29/12/2025, 03/01/2026 (बुधवार)
सुटण्याची वेळ: सकाळी 08:00 (मडगाव)
पोहोचण्याची वेळ: तिसऱ्या दिवशी पहाटे 04:30 (अमृतसर)
महत्त्वाचे थांबे (Stops)
बियास, जालंधर सिटी, लुधियाना, अंबाला कॅंट, पानिपत, दिल्ली सफदरजंग, मथुरा, सवाई माधोपूर, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.
गाडीची रचना (Coach Composition – LHB)
एकूण 21 एलएचबी कोच:
- 3 टायर एसी: 02
- 3 टायर एसी इकॉनॉमी: 02
- स्लीपर क्लास: 08
- जनरल कोच: 07
- जनरेटर कार: 02
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या विशेष सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहिती व वेळापत्रकासाठी: www.enquiry.indianrail.gov.in

