( लनाशिक / प्रतिनिधी)
नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री श्री. दादा भुसे यांनीही नाशिक दौऱ्यात परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांचे आशीर्वाद घेत त्यांच्याशी संवाद साधला.
नाशिकमध्ये शिवसेनेचे नेते विलास शिंदे यांची कन्या श्रद्धा आणि प्रकाश पाटील यांचा सुपुत्र प्रतीक यांचा शुभविवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.यावेळी आशीर्वाद देण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली उपस्थित होते. तेव्हा विवाह सोहळ्याला आलेले उपमुख्यमंत्री शिंदे, ना.दादा भुसे यांनीही गुरुमाऊलींची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले आणि काही काळ गुरुमाऊलींशी वार्तालाप केला.
सोमवारी सकाळी नाशिकमध्ये (२जून) एका हॉस्पिटलच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी परमपूज्य गुरुमाऊलींचा यथोचित सन्मान करून शुभाशीर्वाद घेतले होते.त्यानंतर सायंकाळी नाशिक दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्र्यांनीही गुरुमाऊलींचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. आपल्या हातून राज्याची आणि जनतेची अधिक चांगल्या प्रकारे सेवा होऊन महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत अधिकाधिक गतिमान होवो असा आशीर्वाद मंत्रीमहोदयांना गुरुमाऊलींनी दिला.