(देवरुख)
एसटीच्या सेवनिवृत्त संघटनेची सभा संघटनेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक सचिव विजयराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार १५ डिसे. रोजी प्रसन्न जेष्ठ नागरिक सभागृह देवरूख येथे संपन्न झाली. सचिव प्रकाश जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रकाश जाधव यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले त्याला सर्वांनी मंजुरी दिली. विजयराव शिंदे यांनी केंद्रात संघटनेच्या कामा बाबत व सांगली येथील सभेत झालेल्या विषयाची सविस्तर माहिती दिली.
दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी होणारा संघटनेचा सत्कार सोहळा कार्यक्रम कसा असेल, नियोजन कसे असेल याची माहीती दिली. तसेच वाढदिवस असलेल्या सभासदांचा गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तर वाढदिवस असणाऱ्या सभासदांनी यावेळी अल्पोपहार दिला
या प्रसंगी श्री.अभय पुरोहित, विजय निंबाळकर, संजय वेल्हाळ, संजय देसाई, दिलीप पोरे, केशव नार्वेकर यांनी आपले विचार मांडले. श्री प्रभाकर भिडे, दिलीप कशेळकर, राजाभाऊ वनकर, विनायक केतकर असे अनेक जेष्ठ सभासद यावेळी उपस्थित होते.

