( संगमेश्वर / प्रतिनिधी )
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती, कसबा संगमेश्वर आयोजित स्वराज्य रत्सक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त रत्नागिरी जिल्हा मर्यादीत भव्य चित्रकला स्पर्धा २०२५ चे १४ मे २०२५ रोजी कसबा येथे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा खुल्या गटासाठी असून वेळ : सकाळी ८:३० ते दुपारी १.०० पर्यंत ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेचे विषय : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत महत्वाचे प्रसंग. स्पर्धेचे नियम
१) स्पर्धा खुल्या गटासाठी आहे.२) या स्पर्धे मध्ये माध्यमांचे बंधन नाही. कोणत्याही माध्यमांमध्ये चित्रकार चित्र काढू शकतो.३) स्पर्धेसाठी आवश्यक पेपर, कॅनव्हास स्पर्धकांने स्वतः घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच इतर आवश्यक साहित्य स्वतः स्पर्धकाने घेवून येणे. ४) स्पर्धेचे निर्णय समितीकडे राहतील. ५) स्पर्धकांनी चित्रित केलेली सर्व चित्रे समितीकडे राहातील. ६) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल. ७) स्पर्धकांने चित्रित केलेले चित्र कॉपी असू नये. ८) सदर चित्र दिलेल्या ठिकाणी जाऊन चित्रित करावयाचे आहे.
सदर स्पर्धेसाठी भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
प्रथम क्रमांक रु. २५०००/-सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक, व्दितीय क्रमांक रु. २००००/-सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक,तृतीय क्रमांक रु. १५०००/-सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक, उत्तेजनार्थ रु. ५०००/- पाहिले सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक
नाव नोंदणीसाठी बोरसुतकर गुरुजी ९४२२४२९६७३, राजेंद्र विष्णू महाडिक ९४०३३६१११६ यांच्या जवळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धकांची नाष्टा व जेवण व्यवस्था आयोजकांच्या वतीने केली जाणार आहे. स्पर्धेचे ठिकाण कर्णेश्वर मंदिर परिसर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसर कसबा, संगमेश्वर असा ठेवण्यात आले आहे.