(रत्नागिरी)
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत रत्नागिरीमध्ये एल.ई.डी. लाईट वापरून अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात आली आहे.
दि. ०४/१२/२०२५ रोजी रात्री सुमारे १२.२५ वाजता, श्री. प्रविण काशिनाथ दळवी यांच्या “हर्षाली” (क्र. IND-MH-4-MM-1412) नौकेला एल.ई.डी. लाईट वापरून मासेमारी करताना मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री. चिन्मय जोशी व परवाना अधिकारी रत्नागिरी यांनी पकडले.
याचप्रमाणे, दि. १४/१२/२०२५ रोजी रात्री ११.०० वाजता, पुर्णगड येथे, श्री. मोहसीन अब्दुल गफुर वस्ता यांच्या “महिन” (क्र. IND-MH-4-MM-5091) नौकेला अनधिकृत एल.ई.डी. लाईट वापरून मासेमारी करताना श्रीम. लतिका गावडे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी व श्रीम. रसिका सावंत, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांनी पकडले.
सदर नौका जप्त करून मिरकरवाडा बंदरात ठेवण्यात आली असून, नौकेवरील लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे देखील जप्त केली गेली आहेत. सदर कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अंमलबजावणी अधिकारी, गस्ती नौका व संबंधित कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. सदर नौकांबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार आहे.

