(चिपळूण)
चिपळूण संघर्ष क्रीडा मंडळ आयोजित आणि चिपळूणकरांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली दुसरी चिपळूण हाफ मॅरेथॉन रविवारी सकाळी उत्साहात पार पडली. राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यांतूनही धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. एकूण १,८९५ धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेचा शुभारंभ सकाळी साडेसहा वाजता चिपळूणचे आमदार शेखर निकम, अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे, प्रो-कबड्डी खेळाडू असलम इनामदार, पंकज मोहिते, आदित्य शिंदे, तसेच संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम यांच्या उपस्थितीत झाला.
धावपटूंना इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र—चिपळूण बाजारपेठ—गोवळकोट—काळुस्ते—तीर्थक्षेत्र असा मार्ग देण्यात आला होता. संपूर्ण मार्गावर स्वयंसेवक मोठ्या संख्येने तैनात होते. त्यांनी धावपटूंना पाणी, मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन देत उत्कृष्ट वातावरण निर्माण केले.
पर्यावरणपूरक थीम : “धावू या प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी”
या वर्षीची स्पर्धा पर्यावरण संवर्धनाला वाहिलेल्या थीमवर आधारित होती. स्पर्धेचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून एअर मार्शल हेमंत भागवत, प्रसाद देवस्थळी (रत्नागिरी) आणि संध्या दाभोळकर यांनी काम पाहिले. या उपक्रमासाठी थीम पार्टनर म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र संस्था जोडली गेली होती. संस्थेने १९९२ पासून पर्यावरण संवर्धनात महत्त्वपूर्ण काम केले आहे. गेल्या पाच वर्षांत संस्थेने तब्बल २५० टन प्लास्टिक संकलित करून पुनर्वापरासाठी पाठवले आहे.
स्पर्धकांना बीब घेतेवेळी किमान १०० ग्रॅम स्वच्छ प्लास्टिक जमा करण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमातील सहभागींसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला असून विजेत्यास स्मार्ट वॉच देण्यात आला. स्पर्धेचे यशस्वी आयोजन सचिन कदम, प्रसाद आलेकर, नयन साडविलकर, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, तसेच रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांनी संयुक्तपणे केले.
विविध गटांतील विजेते
- ५ किमी मुली – १६ वर्षे गट : हुमेरा सय्यद, अनुष्का खेराडे, देविका बने
- ५ किमी मुली – १७ वर्षाखालील गट : सिद्धी चिनकटे, वेदिका बामणे, वेदिका हरवडे
- ५ किमी मुली – १४ वर्षे शालेय गट : इच्छा राजभर, श्रेया बने, मृणाली खेराडे
- ५ किमी मुली – १५ वर्षे शालेय गट : निधी शिगवण, संगमी गुडेकर, रिया भानशे
- ५ किमी मुले – १६ वर्षे शालेय गट : साईप्रसाद वराडकर, अथर्व दवंडे, तन्वेज पालशेतकर
- ५ किमी मुले – १७ वर्षे शालेय गट : पृथ्वी राजभर, आयुष बर्गे, मनीष पालगे
- ५ किमी मुले – १४ वर्षे गट : आर्यन सुर्वे, मंथन दुदे, वेदांत खेराडे
- ६० वर्षेवरील पुरुष गट : निहुतराम विश्वकर्मा, संजय शिंदे, लक्ष्मण कांबळे
- १४–५० वर्षे गट : दीपक वरफे, महेश पवार, मयुरेश बेंडल
- १४–६० वर्षे गट : भारत घोले, डॉ. सुनील निकम, ज्ञानेश्वर पवार
- पुरुष खुला गट : स्वराज्य जोशी, संदीप जोशी, यश शिर्के
- ३१–४० पुरुष गट : गणेश राजवीर, चेतन नानिजकर, उमेश खेडेकर
- ५१–६० महिला गट : सुशीला विखारे, ज्योती दाढा, सरिता कर्वे
- ६० वर्षेवरील महिला गट : शालन रानडे, प्राची जोशी, अस्मिता वानकर
- महिला खुला गट : ऐश्वर्या लोंढे, कोमल मोहिते, श्रावणी पवार
- १० किमी पुरुष खुला गट : सुरज झोरे, ओंकार बैकर, गणेश काले
- १० किमी – ३१ ते ४० पुरुष गट : अनिल कोरवी, देशराज मिना, धोंडीबा गिरतवाड
- २१ किमी महिला – ४१ ते ५० गट : कामिनी पटेल, मानसी मराठे, विभावरी सप्रे
- २१ किमी महिला खुला गट : साक्षी जड्याळ, अमरिता पटेल, श्रेया पाटील
- २१ किमी – ६० वर्षेवरील पुरुष गट : मृणाल विश्वास, उदय महाजन, अलेक्स कोयलो
- २१ किमी – ४१ ते ५० पुरुष गट : सुनील शिवने, पवन प्रजापती, अमित विचारे
- २१ किमी – ५१ ते ६० पुरुष गट : जगदाळे प्रभाकर, अनिल टोकरे, जॉर्ज थॉमस
- २१ किमी खुला पुरुष गट : राज तिवारी, दिनेश, हरीश शेवरण
- २१ किमी – ३० ते ४० पुरुष गट : समीर माळी, योगेश सानप, सुशीलकुमार भारतीय
राज्यभरातून धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या स्पर्धेत छत्तीसगड, कर्नाटक, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, पंजाब या राज्यांतील ३० धावपटूंनी सहभाग घेतला.
महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमधून ३९० धावपटू, तर एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातून तब्बल १,५८४ धावपटू धावले.
- २१ आणि १० किमी : सुमारे ५०० स्पर्धक
- ५ किमी शालेय गट : सुमारे १२०० विद्यार्थी
स्थानिक प्रोत्साहनासाठी ५ किमीचा स्वतंत्र गट केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील धावपटूंकरिता राखीव ठेवण्यात आला होता. चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनीही जनजागृतीसाठी धाव घेतली.

