(चिपळूण)
चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध जाग्रुत श्रध्दास्थान श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नवरात्र महोत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा सोमवार दि. २२ सप्टेंबरपासून आश्विन शुध्द दशमी (दसरा) गुरुवार दि. ०२ ऑक्टोंबर रोजीपर्यंत ग्रामदैवते श्री जुना कालभैरव मंदिर, श्री देव केदारेश्वर मंदिर (वैश्यवसाहत), श्री देवी ऐकवीरा मंदिर (वडनाका), श्री देवी भवानी मंदिर, श्री कात्रादेवी मंदिर (श्री क्षेत्र गांधारेश्वर) चिपळूण येथे विविध धार्मिक व सांस्क्रुतिक कार्यक्रमांच्या आयोजनाने पारंपरिकरित्या साजरा होत आहे.
त्यानिमित्त श्री ग्रामदेव जुना काळभैरव मंदिर, चिपळूण येथे आयोजित नवरात्र उत्सव कार्यक्रम पुढील प्रमाणे –
सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी श्री देव घटी बसविणे (नवरात्र उत्सव प्रारंभ), श्री देव काळभैरव – श्री देवी जोगेश्वरी, श्री देव केदार – श्री देवी जाखमाता, श्री देवी ऐकविरा, श्री देवी भवानी, श्री कात्रादेवी यांची घटस्थापना. सायंकाळी ५ ते ७ श्री विश्वकर्मा प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (चिपळूण) आणि रात्रौ १० ते १२ श्री हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ (ओझरवाडी), चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.
मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ श्री सिद्धि प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (पाग) चिपळूण, रात्रौ १० ते १२ श्री कालभैरव प्रासादिक संगीत भजन मंडळ (शंकरवाडी) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.
बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ श्री जिव्हेश्वर प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (पेठमाप) चिपळूण, रात्रौ १० ते १२ श्री नवयुवक प्रासादिक संगीत भजन मंडळ (कांगणेवाडी/खेंड) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.
गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ श्री हनुमान प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (पाग) चिपळूण, रात्रौ १० ते १२ श्री गांधारेश्वर प्रासादिक संगीत भजन मंडळ (शंकरवाडी) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.
शुक्रवार दि. २६ सप्टेंबर रोजी ललितापंचमी सकाळी १० वाजता कुंकुमार्चन धार्मिक विधी, सकाळी ११ वाजता कुमारिका पूजन (सहभाग :- कन्याशाळा) चिपळूण विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्य वाटप. सकाळी १० ते १ सप्तशती पाठ वाचन सामुदायिक सहभाग – श्री कात्यायनी महिला मंडळ (चिपळूण). सायंकाळी ५ ते ७ श्री देवी कालिकामाता प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (पेठमाप) चिपळूण, रात्रौ ९ ते ११ श्री तुकारामबुवा जोगले प्रासादिक वारकरी संगीत भजन मंडळ (शंकरवाडी) चिपळूण, रात्रौ ११ ते १ श्री हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ (पाग) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.
शनिवार दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ पारंपारिक भोंडला (१८वे वर्ष) सादरकर्ते सहेली ग्रुप (चिपळूण). रात्रौ ९ ते ११ श्री विश्वकेदार प्रासादिक वारकरी संगीत भजन मंडळ (पवारआळी) चिपळूण, रात्रौ ११ ते १ श्री विट्ठल प्रासादिक संगीत भजन मंडळ (पांचमाडकर – खेंड) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.
रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ श्री देव लक्ष्मी नारायण महिला मंडळ (चिपळूण) प्रस्तुत श्री देवी स्तवन, श्री सूक्त पठण, स्तोत्र, कवच, मंत्रजप, आरती. सायंकाळी ५ ते ७ कै. वामनराव साडविलकर संस्थापित स्वरदर्शन कलाकुंज प्रस्तुत संगीत स्वरसुमनांजली अंतर्गत स्वरसखी (महिलांचा विशेष सहभाग). रात्रौ १० ते १२ श्री देव हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ (हेलेकर मारुती मंदिर – खेंड) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.
सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ श्री श्रीराम प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (वैश्यवसाहत) चिपळूण, रात्रौ ९ ते ११ श्री मुरलीधर प्रासादिक संगीत भजन मंडळ (वैश्यवसाहत) चिपळूण, रात्रौ ११ ते १ श्री श्रीराम प्रासादिक संगीत भजन मंडळ (वैश्यवसाहत) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.
मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी उपवास. सायंकाळी ५ ते ७ श्री स्वररत्न प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (पाग) चिपळूण, रात्रौ ९ ते ११ भोई समाज प्रासादिक वारकरी संगीत भजन मंडळ (वरची भोईवाडी) चिपळूण, रात्रौ ११ ते १ श्री माऊली प्रासादिक वारकरी संगीत भजन मंडळ (पवार आळी) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.
बुधवार दि. ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी श्री देव घटी उठविणे – श्री देव कालभैरव – श्री देवी जोगेश्वरी, श्री देव केदार – श्री देवी जाखमाता, श्री देवी ऐकवीरा, श्री देवी भवानी, श्री कात्रादेवी (उत्थापन). सायंकाळी ५ ते ७ श्री गणेशवाडी / मतेवाडी ग्रामस्थ महिला मंडळ (रावतळे) चिपळूण प्रस्तुत ग्रामीण झिम्मा फुगडी कार्यक्रम. रात्रौ ९ ते ११ श्री साई शंकर प्रासादिक संगीत भजन मंडळ (खालची भोईवाडी) चिपळूण, रात्रौ ११ ते १ श्री सुकाई देवी प्रासादिक संगीत भजन मंडळ (पाग नाका) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.
गुरुवार दि. ०२ ऑक्टोबर विजयादशमी (दसरा) दुपारी ३ वाजता श्रींचे सीमोल्लंघन, सोने लुटण्यासाठी श्रींची सवाद्य सहित शाही मिरवणूक. विशेष सहभाग – श्री विघ्नहर्ता पुणेरी ढोल झांज ध्वज लेझीम पथक. त्यानंतर श्रींचा दर्शन सोहळा. सायंकाळी ६ वाजता शिवकालीन युद्धकला सरिपट्टा खेळ सादरकर्ते श्री गणेश मित्र मंडळ (गणेशवाडी / मतेवाडी) रावतळे चिपळूण, पुरस्कृत श्री काळभैरव सरिपट्टा ढोल झांज ध्वज पथक आणि ओझरवाडी ग्रामस्थ मंडळ पुरस्कृत शिवध्वनी ढोल झांज पथक (ओझरवाडी) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.
नवरात्र उत्सव कालावधीत नित्यनियमीत सकाळी श्रींची पूजा अर्चा, रात्रौ ७:३० वाजता धूपआरतीनंतर श्री कालभैरव ध्यान, स्तोत्र, अष्टक, कवच पठण, रात्रौ ९ ते १ भजनादी कार्यक्रम नित्यनियमित होतील याची भाविकांनी नोंद घ्यावी.
भक्तगण नागरिकांनी नवरात्र उत्सवात श्रींच्या सेवाकार्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ग्रामदेव जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण तर्फे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. किशोर शेट्ये, श्री. समीर शेट्ये, महाजन विश्वस्त (सचिव) श्री. पंकज कोळवणकर, कार्यकारी विश्वस्त श्री. चंद्रशेखर लाड, श्री. सुमंता शिंदे आणि नवरात्र उत्सव कमिटी अध्यक्ष श्री. संतोष डांगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रका अन्वये करण्यात येत आहे.

