(लांजा)
लांजा एसटी आगाराच्या दोन बसमध्ये आज सोमवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी अंदाजे १० वाजता साटवली येथे झालेल्या अपघाताने एकच खळबळ उडाली. तीव्र उतार आणि अवघड वळण असलेल्या ठिकाणी दोन बसची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाल्याची माहिती नाही; मात्र दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेत इसवलीहून लांजाकडे येणारी (एमएच २० बीएल २५८६) बस आणि लांजाहून वेळी कडे जाणारी (एमएच १४ बीटी २६८५) यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. साटवली येथील तीव्र उताराच्या वळणावर दोन्ही बस वेगाने आल्याने बस आवरता न आल्याने एकमेकांना धडकल्या.
अपघातामुळे काही काळ प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. तसेच येथील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. या अपघाताबद्दल एसटी प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.

