[ लांजा /प्रतिनिधी ]
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा, लांजा आणि कोरले बौद्धजन संघ संलग्न भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास मालिकेतील पहिल्या व्याख्यानाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, रत्नागिरी जिल्हा शाखेचे महामंत्री, बौद्धाचार्य, श्रामणेर केंद्रीय शिक्षक तथा पाली भाषा अभ्यासक एन. बी. कदम यांनी “भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले.
कदम यांनी भगवान बुद्धांच्या कर्मसिद्धांताचे तत्त्वज्ञान दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणांच्या माध्यमातून अतिशय सोप्या, समर्पक आणि सर्वसामान्यांना सहज समजेल अशा भाषेत उलगडून सांगितले. त्यांच्या ओजस्वी आणि विचारप्रवर्तक व्याख्यानाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश देऊ कांबळे होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई रघुनाथ कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष ममता दिनेश कांबळे, जिल्हा संघटक चंदना चंद्रकांत कांबळे, तालुकाध्यक्ष आर. बी. कांबळे, तालुका सरचिटणीस दिनेश कांबळे, तालुका संघटक रतनजी जाधव यांच्यासह महिला विभागाच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत जाधव, सचिव नेहा विशाल कांबळे, कोषाध्यक्ष मनस्वी मंगेश कांबळे, संस्कार विभागाच्या उपाध्यक्षा वंदना हनुमंत कदम, सचिव आरती आदेश जाधव, प्रचार-पर्यटन सचिव विमल धोंडू जाधव आणि सिद्धी संजय पवार, संघटक सुषमा देवजी जाधव व ताराबाई मनोहर पवार, समता सैनिक यशवंत गुणाजी जाधव व अशोक जाधव, तसेच कोरले ग्रामशाखेचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्यांसह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विभागाच्या तालुका सचिव नेहा विशाल कांबळे यांनी केले. आर. बी. कांबळे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले, तर जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई कांबळे यांनी वर्षावस मालिकेस शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात सुरेश देऊ कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी एन. बी. कदम गुरुजी यांनी पाली भाषा डिप्लोमा परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच ग्रामशाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी तालुका सरचिटणीस दिनेश कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

