(रत्नागिरी / वार्ताहर)
ग्रामपंचायत धामणसे आणि राज फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13/11/2025 रोजी बचत गट आणि युवक युवती साठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये मेणबत्ती, अगरबत्ती, धूपबत्ती बनविणे, कागदी व कापडी पिशव्या बनविणे, फिनेल बनविणे, शोभेची कापडी फुले बनविणे इत्यादी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
बचत गटातील महिलांना व युवक युवतीना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन अभियान काळात लखपती दीदी बनविण्याचा निर्णय ग्रामपंचायत धामणसे ने घेतला आहे. सदर कार्यक्रमा साठी राज फाउंडेशन चे अध्यक्ष श्री संतोष गाठे, उपसरपंच सौं. ऋतुजा कुलकर्णी, ग्रामसंघाच्या अध्यक्ष सौं.धनावडे, ग्रामपंचायत सदस्या सौं. जाधव, सौं. स्वरा देसाई, बचत गटाच्या CRP आणि बहुसंख्य बचत गट प्रतिनिधी, युवक युवती उपस्थित होते.

