(जैतापूर / राजन लाड)
निसर्गसंपन्न जैतापूरच्या खाडीकिनारी श्री. सुभाष राजाराम दांडेकर यांच्या घरात ‘डिलाईट होम स्टे’चा भव्य शुभारंभ पार पडला. या होम स्टेचे उद्घाटन श्री. सुभाष दांडेकर आणि त्यांच्या पत्नी सौ. स्मिता दांडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. डिलाईट होम स्टेची स्थापना राकेश दांडेकर आणि अनुजा दांडेकर यांनी केली असून, पारंपरिकतेचा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम सादर करणारे हे स्थान जैतापूरच्या पर्यटन क्षेत्रात एक नवे आकर्षक गंतव्यस्थान ठरणार आहे.
उद्घाटन सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी दांडेकर कुटुंबाचे अभिनंदन करत आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात जैतापूरचे मा. सरपंच तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. गिरीश करगुटकर, राज्य युवा पुरस्कार विजेते व ग्रामपंचायत सदस्य श्री. दिवाकर आडविरकर, शिवसेना माजी विभागप्रमुख श्री. नंदू मीरगुले, उपसरपंच सौ. मिनल माजरेकर, जैतापूर हायस्कूलचे माजी प्राचार्य श्री. विलास डंबे, ज्येष्ठ शिक्षक श्री. प्रसाद पंगेरकर, हॉटेल ‘कोकण स्वाद’चे मालक श्री. जलाल काझी, माजी उपसरपंच श्री. प्रसाद माजरेकर व श्री. विकास माजरेकर, जयभवानी कला आणि क्रीडा मंडळ, माजरेकरवाडीचे अध्यक्ष श्री. पंकज पाटील, दळे ग्रामपंचायत सदस्या सौ. स्नेहल गिरकर, तसेच सामाजिक कार्यकर्ते बंड्याशेठ चव्हाण, भरत जाधव, ओमकार मांजरेकर, प्रितेश देवळेकर, सागर पवार, परेश भाटकर, मिलिंद गिरकर, प्रणव गिरकर, अन्या माजरेकर, मुबिन तडवी, संतोष हरचकर, सुहास पवार, शशांक पावसकर आणि स्वप्नील करगुटकर यांचा समावेश होता.
उद्घाटनानंतर दळे गावचे सरपंच श्री. महेश करगुटकर, सदस्य श्री. संकेत लासे, सामाजिक कार्यकर्ते श्री. हर्षद मांजरेकर, स्वप्नील सोगम आणि ‘वैभव स्वॉ’चे मालक श्री. वैभव कुवेसकर यांनी उपस्थित राहून डिलाईट होम स्टेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमानंतर पाहुण्यांनी परिसरातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत ‘डिलाईट होम स्टे’च्या सुंदर वातावरणाचे व व्यवस्थेचे कौतुक केले, तसेच येथील पारंपरिक आणि आधुनिक वास्तुकलेच्या संगमाची दखल घेतली.
जैतापूरच्या पर्यटन क्षेत्रात हे होम स्टे नवीन उत्साह आणि संधी निर्माण करणार असून, स्थानिक आणि बाह्य पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण ठरण्याची अपेक्षा आहे.

