(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी तरवळ येथील सरोदे समाज विकास मंडळाचा युवा कार्यकर्ता प्रथमेश मोहन शिवगण याचे बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्याने वयाच्या ३४ व्या वर्षी रत्नागिरी येथे दुःखद निधन झाले.
प्रथमेश उर्फ संकेत मोहन शिवगण हे उत्तम वाहन चालक होते. भांडी धंदा हा त्यांच्या कुटुंबीयांचा व्यवसाय पूर्वापार चालत आलेला आहे. तो आपल्या आई-वडिलांना या व्यवसायात मदत करत असे. वडीलांच्या निधनानंतर प्रथमेश आपल्या लहान भावाला आणि आपल्या आईला या व्यवसायात चांगली साथ देत आला होता. संकेत याच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी त्याचा भाऊ आणि आई यांनी डॉक्टर उपचारासाठी खूप प्रयत्न केले होते. संकेत कष्टाळू आणि मनमिळावू होता. अल्पशा आजाराने प्रथमेश उर्फ संकेत शिवगण याचे बुधवारी अकाली निधन झाले.
या निधनाबद्दल शिवगण कुटुंबियांसह नातेवाईक तसेच तरवळ जाकादेवी खालगांव सरोदे समाज विकास मंडळाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, आजी, चुलते असा मोठा परिवार आहे. या युवा कार्यकर्त्यांच्या अंत्ययात्रेत जाकादेवी खालगाव परिसरासह विविध स्तरातील कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

