(गणपतीपुळे / वैभव पवार)
‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान आणि कुटुंबश्री NRO यांच्या संयुक्त विद्यमाने एकता महिला प्रभागसंघ कोतवडे येथे pri-cbo convergence project अंतर्गत तालुक्यातील पहिली मूल्यमापन कार्यशाळा दिनांक ५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली.
या कार्यशाळेच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रार्थना म्हणण्यात आली. तसेच बालगटातील मुलांनी संविधान म्हटले. त्यानंतर उपस्थित नेवरे गावचे सरपंच दिपक फणसे, निवेंडी गावच्या सरपंच रविना कदम, ओरी सरपंच स्वाती देसाई, भगवतीनगर सरपंच प्रिया राजवाडकर यांचे स्वागत करण्यात आले. तसेच ग्रामअधिकारी नेवरे प्रणिता सावंत व कोतवडे गावाचे श्री इंगळे यांचे स्वागत करण्यात आले.
उमेद अंतर्गत BMM साक्षी मॅडम, जेजुरकर सर, प्रणव सर, अमेय राजेशिर्के सर तसेच DRP नाकाडे, BRP तोङणकर प्रभागसंघ अध्यक्ष संध्या देवरुखकर, c.c मोरे सर, ग्रामसंघ प्रतिनिधी, क्रेडर, आरोग्य सेवक, आशा ताई यांचे स्वागत करण्यात आले.
BMM मॅडम यांनी प्रकल्पा विषयी सविस्तर माहिती दिली.lrp यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बालगट प्रतिनिधी सोहम शिंदे, आर्या ठावरे, स्वणीॅत घवाळी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तसेच अक्षरज्योती सदस्य लक्ष्मी बोटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन clf आरती देवरुखकर यांनी केले. तसेच तालुक्यातील clf मॅडम,MCRP ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. चार्ट पेपर व रांगोळीच्या माध्यमातून प्रोजेक्ट समजविण्यात आला, याबाबतचे मार्गदर्शन केरळच्या मेंटाॅर गिरजा संतोष यांनी केले होते.
कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली व प्रभागसंघ अध्यक्ष देवरुखकर मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम उत्साहात संपवण्यात आला.

