(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत पॉवर लिफ्टिंग क्रीडा प्रकारात मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील ७ स्पर्धकांना गोल्ड मेडल, एका विद्यार्थ्याला सिल्वर तर एका विद्यार्थ्याला कांस्य पदक प्राप्त झाले आहे. या क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल जाकादेवी कनिष्ठ महाविद्यालयाला जिल्हा चॅम्पियन शीपचा बहुमान मिळाला आहे.
सदरच्या स्पर्धा रत्नागिरी येथील शिवाजी स्टेडियम येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील ७ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल संपादन केले आहे. गोल्ड मेडल संपादित विद्यार्थी पुढीलप्रमाणे -तन्मय घाणेकर, धिरज मायंगडे, रोहित धामणे, संकेत धामणे, आदित्य पाचकुडे, अमन पाचकुडे,हर्ष सनगरे तसेच सुयोग कोवळे याने सिल्वर पदक तर साहिल सावंत याने कांस्यपदक पटकावले आहे.
या विजेत्या स्पर्धकांना प्रशालेतील क्रीडा शिक्षक संतोष सनगरे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. शिक्षण संस्थेचे चेअरमन बंधू मयेकर, मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ यांची उचित प्रेरणा मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन शिक्षकांचे मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्यावतीने चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी अभिनंदन केले आहे. गोल्ड मेडल संपादन केलेल्या स्पर्धकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा कोल्हापूर या ठिकाणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहेत.

