(खेड)
उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपाच्या वतीने खेड येथे आयोजित पक्ष प्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप परिवारात प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली.
माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या सोहळ्यास माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा नेते प्रशांत यादव यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात नव्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विचारधारेप्रती निष्ठा व्यक्त करत आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला संघटनात्मक बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.

