(खेड)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामसभेचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी कळंबणी बु. येथे करण्यात आले होते. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच भगवान साळुंके होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सचिव व मुख्याधिकारी संतोष चव्हाण यांनी स्वागत, प्रास्ताविक तसेच शासनाच्या परिपत्रकावर सविस्तर माहिती दिली. ग्रामसभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटशिक्षणाधिकारी विजय बाईत उपस्थित होते, तर नोडल अधिकारी म्हणून अनंत भागणे यांनी काम पाहिले. या वेळी साधारण 120 ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसभेच्या यशस्वी आयोजनासाठी तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम येरापले, ग्रामपंचायत सदस्य, गावातील मान्यवर, महसूल अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्य केले.
सभेच्या शेवटी सरपंच भगवान साळुंके यांनी ग्रामपंचायत कळंबणी बु. नेहमीच अग्रस्थानी राहावी यासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच ग्रामसभेला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

