(लांजा)
लांजा तालुका भाजपाच्या दक्षिण युवा मोर्चा अध्यक्षपदी जयेश माजळकर या युवा कार्यकर्त्याची निवड करण्यात आली आहे.
जयेश माजळकर हे गेली अनेक वर्षे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय तरुण उद्योजक अशी त्यांची ओळख आहे. सध्या ते माजळ या गावचे विद्यमान उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या एकूणच पक्ष कार्याची दखल घेत भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी त्यांची भाजपा युवा मोर्चाच्या लांजा दक्षिण युवा मोर्चाचे अध्यक्षपदी निवड केली आहे.
या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. या वेळी लांजा दक्षिण तालुका मंडळ अध्यक्ष शैलेश खामकर, युवा जिल्हा अध्यक्ष मंदार खंडकर, निमंत्रित सदस्य विजय कुरूप, श्रीकृष्ण हेगिष्ट्ये, उत्तर तालुका मंडळ अध्यक्ष विराज हरमळे, आणि अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडीबद्दल जयेश माजळकर यांच्यावर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

