(चिपळूण)
चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध, जागृत श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण तर्फे प्रतिवर्षाप्रमाणेच यंदाही त्रिपुरारी पौर्णिमा उद्या बुधवार दि. ०५ नोव्हेंबर रोजी श्री ग्रामदेव जुना कालभैरव – श्री देवी जोगेश्वरी मंदिर ( चिपळूण ) व श्री केदार – श्री देवी जाखमाता मंदिर ( वैश्यवसाहत ) येथे दीपोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाने साजरा होत आहे.
त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त श्री जुना कालभैरव मंदिर प्रांगणात विघ्नहर्ता ग्रुप, चिपळूण यांनी दिवाळी पासून साकारलेली किल्ले तोरणा (प्रचंड गड) प्रतिकृती आणि दुर्गवीर प्रतिष्ठान आयोजित किल्ले / गड प्रतिकृती छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.
त्याचप्रमाणे श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण अंतर्गत देवस्थाने श्री देवी एकवीरा ( वडनाका ), श्री क्षेत्र गांधारेश्वर येथील श्री गांधारेश्वर मंदिर, श्री भवानी मंदिर ( मुरादपूर ) येथेही प्रतिवर्षाप्रमाणेच यंदाही त्रिपुरारी दीपोत्सव साजरा होत आहे. याची भक्तगण नागरिकांनी नोंद घेऊन श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

