( लांजा )
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांनी केलेल्या वाहनतपासणीत एका कारमध्ये ७,४०० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्याचा साठा सापडला. तो पोलिसांनी जप्त केला असून, खालापूर (जि. रायगड) येथील कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी सायंकाळी देवधे येथे करण्यात आली. .
संदेश विलास मांडे (वय ३४) असे गुन्हा दाखल केलेल्या कारचालकाचे नाव आहे. मुंबई-गोवा महामार्गावर लांजा पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. महामार्गावरील देवधे येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती.त्यावेळी तेथील एका धाब्यासमोर मुंबईच्या दिशेने जाणारी कार (एमएच ४६, सीपी ३७१३) थांबवून पोलिसांनी तपासणी केली. या गाडीत गोवा बनावटीचा ७,५०० रुपयांचा मद्याचा साठा सापडला. तो पोलिसांनी जप्त केला आहे.
विनापरवाना गोवा बनावटीच्या मद्याची विक्री तसेच साठा जवळ बाळगल्याप्रकरणी संदेश मांडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करीत आहेत.