(रत्नागिरी / प्रतिनिधी)
लांजा तालुक्यातील गोवीळ गावात आंबा कलमावरून पडून एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता. ५) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीचे नाव सुहास गंगाराम लाखण (वय ५१) असे आहे.
लाखण हे सकाळी आंबा कलमाच्या झाडावर आंबे काढत असताना, त्यांनी पकडलेली फांदी तुटली आणि ते सुमारे १५ फूट उंचीवरून खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या छातीला गंभीर मुका मार लागला. घटनेनंतर लाखण यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
रुग्णालयातील पोलिस चौकीत या मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.