(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दि. ५ नोव्हेंबर २०२५ (बुधवार) रोजी सकाळी स.७.०० वा. श्री स्वामी समर्थ पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर स.८.०० वा. श्री स्वामी समर्थ पादुकांवर अभिषेक विधी पार पडेल. मध्यान्ही दु.१२.०० वा. भव्य पालखी प्रदक्षिणा होईल.
यानंतर दु.१२.३० वा. श्रींची महाआरती संपन्न होईल. कार्यक्रमाचा समारोप दु.१.०० ते दु.३.०० या वेळेत आयोजित महाप्रसादाने होणार असून सर्व भक्तांना प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मठाचे पुजारी श्री सहदेव पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या पवित्र पौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा आणि मठात होणाऱ्या भक्तिसोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पावसकर यांनी केले आहे.

