(रत्नागिरी)
ब. प. विद्यालय परकर येथे १९८४ सालच्या एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या उपयोगासाठी वॉटर कुलर भेट देत सामाजिक बांधिलकी जपली.
दिनांक १ मार्च रोजी १९८४ बॅचचा “स्मृतीगंध” स्नेहमेळावा नेवरे येथील मधुरा गार्डन येथे उत्साहात पार पडला. गेल्या नऊ वर्षांपासून हे माजी विद्यार्थी दरवर्षी आवर्जून एकत्र येत शालेय आठवणींना उजाळा देतात आणि शाळेशी असलेले नाते अधिक घट्ट करतात.
यंदा स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेला भेट देत शाळेचे ऋण अंशतः फेडण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेला वॉटर कुलर शाळेला भेट देण्यात आला, ज्यामुळे दैनंदिन गरजांसाठी मोठी मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी गजानन जोशी, विनायक माचीवले, नंदन ढापरे, संजय सुर्वे, राजन जोशी, सहदेव दुर्गवळी, उमेश साळवी, निनाद कोसुंबकर, माधुरी पवार, कांचन केळकर, निता बापट, उदय लिंगायत, उदय पडवळे, रेखा रानडे, रेखा जाधव, अनंत बागवे, सुशील मिरकर, नीलिमा पडवळे, संगीता मालगुंडकर, संगीता मांडवकर, माधव आग्रे, रवी केळकर, संगमी मयेकर, सतीश सोबळकर, संतोष तोडणकर, छाया भोसले, सिंधू बापट, अमोल खेऊर, चारुहास मोरे, अनिल लवंदे, विजय सुर्वे, राजश्री मालगुंडकर व संगीता पाटील यांनी योगदान दिले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. बिपिन परकर यांनी शाळेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि अशा उपक्रमांमुळे शाळा व माजी विद्यार्थी यांचे नाते अधिक दृढ होत असल्याचे नमूद केले.

