(जाकादेवी / वार्ताहर)
बेलारी बौध्द विकास मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते संतोष जाधव यांचे वडील नारायण (तात्या ) गोविंद जाधव यांचे वयाच्या ८० व्या वर्षी १८ रोजी रत्नागिरी येथे वृद्धापकाळाने दुखद निधन झाले.
नारायण तात्या जाधव एक जुने जाणते सेवाभावी वृत्तीचे कष्टाळू व्यक्तिमत्त्व होते. अनुभवी शेतकरी म्हणून ते प्रसिद्ध होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची शेतीवर फार मोठी श्रद्धा होती. रत्नागिरी येथे उपचारादरम्यान त्यांचे १८ रोजी निधन झाले. ते धाडसी व मनमिळावू होते. त्यांची अंत्ययात्रा रविवार दि. १९ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरी बेलारी येथून निघणार आहे. दिवंगत नारायण उर्फ तात्या यांना बेलारी बौध्द विकास मंडळ ग्रामस्थ तथा मुंबई व माता रमाई महिला मंडळ ग्रामस्थ तथा मुंबई संघटनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तात्या जाधव यांच्या निधनाबद्दल शाखेचे सेक्रेटरी राहुल जयवंत मोहिते यांनी दुःख व्यक्त केले आहे.

