(रत्नागिरी / प्रतिनिधी)
बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीरामजीं यांचे तत्कालीन सर्वात जिव्हाळ्याचे सहकारी डॉ. सी.पी.थोरात यांचे १८ रोजी दीर्घ आजाराने वयाच्या ८७ व्या वर्षी पुणे येथे दुःखद निधन झाले. बहुजन समाज पार्टीत डॉ .सी. पी.थोरात यांचे योगदान अनन्यसाधारण होय. त्यांनी आपल्या आयुष्यात समाजाप्रती फार मोठा त्याग केला. डॉ सी पी थोरात हे कांशीरामजी यांचे जवळचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जात.
डॉ. सी.पी.थोरात यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून दुःख व्यक्त होत आहे. डॉ. सी.पी.थोरात यांनी बहुजन समाज पार्टीची ध्येयधोरणे संपूर्ण राज्यभर रूजवण्यासाठी रक्ताचे पाणी केले. त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडविले. त्यांची अंत्ययात्रा आज (रविवार दि. १९ ऑक्टोबर) रोजी सकाळी ११ वाजता श्रावस्ती नगर घोरपडी गाव पुणे ते कोरेगाव पार्क स्मशानभूमी इथपर्यंत निघणार आहे.
तरी महाराष्ट्रातील बामसेफ, बीएसपी व अन्य सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. सी.पी.थोरात यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. सी. पी. थोरात यांच्या निधनामुळे मुंबई भिवंडी विभागातून बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक राजेश पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

